माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह इतरांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहेरून पैसे आणण्यासाठी आणि दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पती, सासूसह इतरांवर  याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती समीर आखाडे, रेखा आखाडे, शमिका कुदळे, प्रशांत कुदळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्मिता समीर आखाडे (वय 44, रा.बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता व समीर यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून कौटुंबिक कारणावरून पतीने स्मिता यांचा छळ सुरू केला. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यातच दोन्ही मुलीच झाल्यामुळे त्यांचा छळ सुरू केला.

30 तोळे सोन्याचे दागिने व इतर वस्तू घेऊन तक्रारदार यांना न नांदवता त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार अर्ज दिला होता. याप्रकरपणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.