पुणे – फॅब्रीकेशन कामाचे पैसे न देता 46 लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फॅब्रीकेशनच्या कामाचे 46 लाख 29 हजार रूपये न दिल्याच्या आरोपावरून तिघांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण परिसरात 2015 ते 2018 या कालावधीत ही घटना घडली.

नुरीयल पेंझरकर, श्वेता नेगी, सुमेश बापट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र विठ्ठल तानवडे (वय – 44, रा. वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली आहे.

आरोपींची नोबेल एक्सचेंज सोल्युशन प्रा. लि. नावाची कंपनी आहे. संबंधित कंपनीत रवींद्र यांनी जीत एक्सपोर्टस फर्मच्या माध्यमातून 63 लाख 26 हजार रुपये किंमतीचे इंजिनिअरिंग व फॅब्रीकेशनचे काम केले होते. या कामाच्या मोबदल्यात त्यांनी 16 लाख 97 हजार रुपये वेळेवेळी दिले. मात्र, आरोपींनी राहिलेले 46 लाख 29 हजार रूपये दिले नाही. त्यांच्याकडे रवींद्र यांनी वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस तपास करत आहेत.