पुणे : डेक्कनला तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेक्कन जीमखाना गेटजवळ उभा असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तनय पगार ऋषीपाठक यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा मोबाईल 30 हजार रुपयांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत उत्तमनगर परिसरातील एका दुकानात शिरून मोबाईल व इतर वस्तू असा 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी झेवरीवर पॉल कॉलवीन याला अटक केली आहे. याबाबत जयदीप सुनिल काटे यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहे.