
पुण्यात कोंढाव्यात मोहम्मद वाडीत दिल्ली पब्लिक शाळेजवळील एका रहिवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ही आग लागली आहे, अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुण्यात रहिवाशी इमारतीला आग; कोणतीही जीवितहानी नाही #Viralvideo #Saamanaonline #Punefire pic.twitter.com/qnMeyFGiFg
— Saamana (@SaamanaOnline) February 6, 2024
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग मोठ्या प्रमाणात पसरली होती, ज्यामुळे आग आटोक्यात आणणे आव्हानात्मक होते. आग लागली तेव्हा इमारतीच्या छतावर रहिवासी उपस्थित होते. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.






























































