
भरधाव वेगातील रुग्णवाहिका चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला. हा अपघात 13 फेबु्रवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास नर्हे परिसरात घडला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरूद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेषराव लक्ष्मण चव्हाण (वय 46, रा. आंबेगाव खुर्द ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. कुमार अलकुंटे (वय 31 रा. आंबेगाव खुर्द) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषराव हे 13 फेबु्रवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास नर्हेमध्ये रस्ता ओलांडित होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या रुग्णवाहिका चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने शेषराव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.
























































