Pune News – किरकोळ भांडणातून दुसऱ्या मजल्यावरून ढकलले, मजुराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून एका मजुराने दुसऱ्या मजुराला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात जखमी मजुराचा जागीच मृत्यू झाला. चिंचवड येथील वाल्हेरकरवाडी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. केशवकुमार महतो असे मयत मजुराचे तर पुनीत राम नक्षत्र शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

महतो हा मूळचा बिहारचा असून कामानिमित्त चिखलीतील अष्टविनायक चौक येथे राहत होता. आरोपी आणि मयत दोघेही घर दुरुस्तीच्या कामासाठी आले होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणातून भांडण झाले. याच भांडणातून पुनीतने केशवकुमारला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात केशवकुमारचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी पुनीत घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.