बँकेत नोकरीच्या आमिषाने तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा

बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांनी तरूणाला तब्बल 4 लाख 59 हजारांचा गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2020 ते मार्च 2022 कालावधीत ताडीवाला रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी 27 वर्षीय तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण कुटूंबियासह ताडीवाला रस्ता परिसरात राहायला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये त्याची दोघांसोबत ओळख झाली होती. ओळखीतून दोघांनी तरूणाला बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी दोघांनी तरूणाकडून वेळोवेळी रक्कम घेऊन तब्बल 4 लाख 59 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करीत आहेत.