Pune News – माता न तू वैरिणी! वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून दोन मुलांवर हल्ला; मुलाचा मृत्यू

पुण्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वाघोलीत कौटुंबिक वादातून आईनेच स्वतःच्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी थोडक्यात बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

साईराज संतोष जयाभाय (11) असे मयत मुलाचे नाव आहे. तर धनश्री संतोष जयाभाय असे जखमी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी आई सोनी संतोष जयाभाय हिला पोलिसांनी अटक केली आहे. मूळचे नांदेडचे रहिवासी असलेले जयाभाय कुटुंब कामानिमित्त पुण्यातील वाघोली येथील बाईफ रोड परिसरात राहत होते.

कौटुंबिक वादातून मंगळवारी सकाळी सोनी हिने पती घरी नसताना दोन्ही मुलांवर प्राणघातक हल्ला केला. मुलांना ठार मारून स्वतः आत्महत्या करण्याचा महिलेचा कट होता, अशी प्राथमिक माहिती मिळते. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी थोडक्यात बचावली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.