पुणे सायबर पोलिस तपासात लई हुश्शार, आरोग्य भरती, टीईटी, म्हाडा भरती घोटाळ्याचा उत्कृष्ठ तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात गाजलेल्या आरोग्य सेवक भरती घोटाळ्यासह टीईटी, म्हाडा परिक्षा घोटाळाप्रकरणी पुणे सायबर पोलिसांच्या टीमने प्रकरणांच्या मुळाशी जाउन पर्दापाश केला आहे. बहुतांश प्रकरणात चार्जशीट दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यामुळे सायबर पोलिसांनी केलेले टीमवर्क कौतुकास पात्र ठरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देउन सन्मानित केले.

पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटीचा पर्दापाश करीत बहुतांश आरोपींना अटक केली. तपासादरम्यान महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने 2018 आणि 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेतही (टीईटी) फेरफार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी परिषदेचे आयुक्त शिक्षण विभागाच्या सल्लागाराला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर तत्कलीन आयुक्त जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालकांना जेरबंद करण्यात आले. त्याशिवाय आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी पेपर गैरव्यवहारात सर्वाधिक रोकड टीईटीमध्ये जप्त करण्यात आली. आरोग्य भरतीतील ड विभागाच्या पेपरफुटीनंतर क विभागाचा पेपरही फोडून कोट्यावधींचा गैरव्यवहार करण्यात आला होता.

मुंबई आरोग्य विभाग कार्यालयाचे सहसंचालकासह परिक्षा आयोजक असलेल्या न्यासा कंपनीनेच पेपर फोडल्याप्रकरणी संबंधितांना अटक केली. टीईटी निकाल फेरफाप्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीनंतर न्यासा कंपनीचेही काळे धंदे पुणे पोलिसांनी उघड केले. दबावाला झुगारून पुणे सायबर पोलिसांनी परिक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार उघडकीस आणले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके एसीपी विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, एपीआय रवींद्र गवारी, उपनिरीक्षक अनिल डफळ, उपनिरीक्षक सागर पडवळ, शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, नितीन चांदणे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, प्रसाद पोतदार, यांनी केली .

आरोग्य भरतीसह म्हाडा आणि टाईटी घोटाळा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यासाठी सायबर विभागासह संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टीमवर्क केले. तपासाला गती देउन प्रकरणांच्या मुळाशी जाउन चार्जशीट वेळेत दाखल केले. त्याशिवाय विविध घोटाळ्यातील एजंटांपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची साखळी मोडून काढली. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त