पुण्यातील शाळांची  घंटा आजपासून! लेखी आदेश किंवा शाळेतून सूचना नसल्याने पालक – विद्यार्थी संभ्रमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर क्षेत्रातील शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग उद्या सोमवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. पुणे ग्रामीण क्षेत्रातील शाळा यापूर्वीच 23 नोव्हेंबरला सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील केरोनाची परिस्थिती काहीशी कमी झाल्याने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा सुरू होण्यासंदर्भातील लेखी आदेश काढण्यात आला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतले आहेत. तशी घोषणा त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली.

परंतु, लेखी आदेश काढण्यात आलेले नाहीत. माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे म्हणाल्या, ‘इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांनी अटींची पूर्तता केली आहे, त्या शाळा उद्यापासून सुरू होतील.