
इमारतीच्या बांधकामावेळी क्रेनमधील दगडी गट्टू खाली पडून झालेल्या अपघातात कामगार ठार झाला. ही घटना बालेवाडीतील ग्रँडीयर पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सुपरवायझरसह क्रेनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजलूर रहमान शेख (वय 28, रा. बालेवाडी ) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी रहमान शेख (वय 50, रा . पश्चिम बंगाल) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरातील ग्रँडीयर पार्कमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी पैâजलूर काम करीत होता. 21 ऑगस्टला दुपारी साडेंतीनच्या सुमारास सुपरवायझर आणि क्रेनचालकाच्या निष्काळजीपणामुळे क्रेनमधील एक दगडी गट्टू खाली पडला. त्यावेळी फैजलूर गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बांधकाम साईटवरील सुपरवायझर आणि क्रेनचालकाने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे अपघात झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. माळेगावे तपास करीत आहेत.

























































