पुण्यात दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरल्या बांगड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन चोरट्या महिलांनी दुकानातून  4 लाख 18 हजार रूपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.  याबाबत  प्रकाश पोरजे (34, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 3 जानेवारीला दुपार साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन रस्त्यावरील तनिष्क ज्वेलर्स दुकानात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जानेवारीला दुपारच्या सुमारास तीन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने तनिष्क ज्वेलर्समध्ये शिरल्या होत्या. त्यांनी तेथील कर्मचार्‍यांना सोन्याच्या बांगड्या आणि  इतर दागिने दाखविण्यास सांगितले. त्यानंतर कामगाराचे लक्ष विचलित करून हातचलाखीने महिलांनी  4 लाख 18 हजार रूपयांचे सोन्याच्या बांगड्याचे जोड चोरून नेले. या बाबत पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके तपास करीत आहेत.