गिफ्ट पडले महागात, पुण्यात शिक्षिकेला लाखो रुपयांचा चुना

cyber-crime-generic

गिफ्ट पाठविल्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने शिक्षिकेला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन आरोपींविरोधात आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 या कालावधीत घडली आहे.

फिर्यादी महिला जापनीज भाषा शिकविण्याचे काम करते. डिसेंबर 2020 मध्ये त्यांची फेसबुकद्वारे एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यातूनच त्याने शिक्षिकेला जाळ्यात ओढले. महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगत सायबर चोरट्याने त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर दुसNया आरोपीने शिक्षिकेला कस्टम विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचे गिफ्ट आले असून कस्टम ड्युटीसाठी पैसे भरल्याशिवाय वस्तू ताब्यात मिळणार नसल्याचे सांगितले.

असे सांगत वेळोवेळी  सायबर चोरट्यांनी शिक्षिकेकडून तब्बल 18 लाख 12 हजार रुपये  काढून घेतले. त्यानंतरही महिलेला गिफ्ट मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चौकशीअंती वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गुन्हे एस.पी.साळगावकर तपास  करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या