
पुणे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दगडू हाके यांची वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी हे आदेश पारित केले.
सध्या वारजे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी असलेले शंकर खटके यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांना गुन्हे शाखेत नेमण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील या सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहूल पवार, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना सिंहगड पोलीस ठाण्यात तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांना नियंत्रण कक्षात नेमण्यात आले आहे.



























































