पान विक्रेत्याचा मुलगा पुणे विद्यापीठात पहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील येसगाव या छोट्याशा गावातील पान विक्रेत्याच्या मुलगा पुणे विद्यापीठात बी कॉम मध्ये पहिला आहे. येसगावात मधुकर रामभाऊ शेजवळ यांची लहानशी पानाची टपरी आहे. ते स्वतः पानांची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना या कामात त्यांचा मुलगा शुभम हा त्यांना मदत करीत असत. शुभमने बारावीत 85 % गुण मिळविले होते. तेंव्हापासून अभ्यासासाठी अधिक वेळ देत आता त्याने  एफ. वाय., एस. वाय., टी. वाय. असे सलग तीन वर्ष त्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. तर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम. च्या परीक्षेत विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. विद्यापीठातून ही माहिती कळल्यानंतर शेजवळ कुटुंबीयांना आनंद  झाला.