महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; येरवडा कारागृहात 12 गुंडांची तुरुंगाधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मारहाणीच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या पैद्यांनी तुरुंगाधिकाऱयाला मारहाण केल्याची घटना 15 फेबुवारीला सकाळी नऊच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहात घडली. पैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेल्या इतर पैद्यांनी तुरुंग अधिकाऱयाची सोडवणूक केल्याने त्यांचा जीव वाचला. संबंधित आरोपी हे कुख्यात आंदेकर टोळीतील असल्याची माहिती मिळाली आहे.

विकी बाळासाहेब कांबळे (रा. धनकवडी) याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी विकी कांबळे हा धनकवडी भागातील आहे. त्याच्या विरोधात मारहाण, धमकी देणे या कलमानुसार सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 25 जानेवारीपासून तो कारागृहात बंदिस्त आहे. न्यायाधीन बंदी प्रकाश रेणुसे (रा. धनकवडी) याच्या विरोधात खुनाचा आणि आर्म अॅक्टचा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून फेबुवारीपासून तो येरवडा कारागृहात आहे. दोन्ही पैद्यांना सर्कल क्रमांक एकमध्ये ठेवले होते. 15 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता तुरुंग अधिकारी शेरखान पठाण सर्कल क्रमांक एकमध्ये फिरत होते.

आरोपी विकी कांबळे व प्रकाश रेणुसे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. त्या वेळी पठाण यांनी मध्यस्थी केल्याच्या रागातून संबंधित पैद्यांसह इतर 10 पैद्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूच्या कार्यालयातील खुर्ची शेरखान पठाण यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे असलेल्या इतर पैद्यांनी रोखले. मारहाणीत शेरखान पठाण यांच्या उजव्या डोळ्याखाली आणि डाव्या हाताच्या मनगटाला जखम झाली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गैरवर्तन करणाऱया पैद्यांची बराकीत रवानगी केली. कारागृह प्रशासनाकडून संबंधितावर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली आहे.