धक्कादायक! कोरोना नसलेल्यांनाही होतेय म्युकरोमायकोसिसची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना म्युकरोमायकोसिसने लोकांची झोप उडवली आहे. म्युकरोमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे नागिरांमध्ये घबराट पसरली आहे. आतापर्यंत हा आजार फक्त कोरोना रुग्णांना होतो असे समोर आले होते. मात्र आता या आजाराबाबत आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्युकरोमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र या रुग्णांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाबमधील 159 रुग्णांपैकी 32 रुग्णांना कधीच कोरोना झालेला नाही. ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. या 32 रुग्णांना दुसऱ्या आजारांसाठी स्टेरॉईड दिले गेलेले असू शकते.

‘ज्या व्यक्तींची प्रतिकारक क्षमता कमी असते त्यांना या आजाराची लागण होते. म्युकरोमायकोसिस हा आजार संपर्कात येण्याने पसरत नाही. मात्र वेळीच या आजाराची लक्षण लक्षात आली तर आपण या आजारापासून वाचू शकतो. तसेत जे व्यक्ती कोणत्याही आजारासाठी स्टेरॉईड दिलेले असतात त्यांना देखील या आजाराची लागण होऊ शकते’, असे पंजाबचे नोडल अधिकारी गगनदीप सिंह यांनी सांगितले. आज तक या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.