
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल यांचा खलिस्तानींनीशी असणारे संबंध पंजाबसाठी घातक असल्याचे चन्नी म्हणाले.
‘इंडिया टूडे’शी बोलताना मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी म्हणाले की, पंजाबला आगामी काळात चांगले सरकार मिळावे ही इच्छा आहे. पंजाबमध्ये रामराज्य स्थापन व्हावी हिच प्रार्थना. तसेच यावेळी केजरीवाल यांच्यावर खलिस्तानशी संबंध असल्याच्या चर्चा असून यावरही चन्नी यांनी आपले मत व्यक्त केले.
पंजाब में अच्छी सरकार आए, पारदर्शी सरकार आए, नेक नीति के साथ अगली सरकार चलाने का मौका मिले। मैं हमेशा सभी का भला मांगने वाला हूं इसलिए मैंने पूरे पंजाब के भले के लिए प्रार्थना की: पंजाब के मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी pic.twitter.com/G3vPeGNnCz
— ANI_HindiNews (@AHindinews) February 20, 2022
ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप नाकारलेले नाहीत. ते स्वत: मी दहशतवादी आहे असे म्हणतात (Kejriwal himself is saying that ‘I am a terrorist’) खलिस्तानबद्दल बोलतात आणि खलिस्तानींचे समर्थनही करतात. पंजाबसाठी हे घातक आहे.
गृहमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर सुरू असलेल्या आरोपादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने हा मुद्दा गंभीरतने घेतला असून या आरोपांची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
HM Amit Shah in a letter to Punjab CM assures him that GoI has taken the matter seriously and that he’ll personally ensure that the matter is looked into in detail
Punjab CM had written to HM alleging that banned org ‘Sikhs for Justice’ is in touch with Aam Aadmi Party. pic.twitter.com/1SQwU7KUSd
— ANI (@ANI) February 18, 2022
मी एक दिवस खलिस्तानचा PM बनेन!
आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा आरोप केला. अरविंद केजरीवाल हे पंजाबमधील फुटीरवाद्यांचे समर्थक होते. “एक दिवस, त्यांनी मला सांगितले की मी एकतर (पंजाबचा) मुख्यमंत्री होईल किंवा स्वतंत्र राष्ट्राचा (खलिस्तान) पहिला पंतप्रधान होईल, असे म्हणाले होते असा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर कुमार विश्वास यांच्या सुरक्षेमध्ये केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
राहुल गांधीचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांच्यावर असेच आरोप केले होते. पंजाबमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले, पंजाबला स्थिर सरकारची गरज आहे, मला तुम्ही हे लक्षात ठेवावे की काहीही झाले तरी तुम्हाला काँग्रेसचा नेता दहशतवाद्याच्या घरात सापडणार नाही, तर झाडू (आप-अरविंद केजरीवाल) चा सर्वात मोठा नेता सापडेल. पंजाबसमोर धोका आहे. त्यासाठी चरणजीत चन्नी यांच्यासारख्या तगड्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे.





























































