चोक्सीला जामीन; हिंदुस्थानला धक्का, वैद्यकीय कारणासाठी कोर्टाने सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी चोक्सी याला देण्यात आली आहे. या निर्णयामुळे चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करणाऱया हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे.

डॉमिनिकाच्या ताब्यात असलेल्या मेहुल चोक्सीला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डॉमिनिकामधील न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चोक्सी झूमच्या माध्यमातून रुग्णालयाच्या बेडवरून उपस्थित झाला.

जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ामध्ये चोक्सीच्या प्रकरणात डॉमिनिकाच्या न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती. त्यावेळीसुद्धा आरोग्याचे कारण देऊन चोक्सी उपस्थित राहिला नव्हता. मागच्या सुनावणीवेळीसुद्धा तो रुग्णालयातूनच हजर झाला होता. चोक्सीला दिलासा देताना न्यायालयाने सांगितले की, त्याला डॉमिनिकामध्ये अवैध प्रवेश करण्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी परत यावे लागेल. पीएनबी बँकेला 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर आहे.