
स्मशानातील अस्थी विकून पैसे कमावणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करम्यात पंजाब पोलिसांना यश आलं आहे. या टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
हे प्रकरण पंजाब येथील खन्ना इथलं आहे. पोलिसांनी येथील स्मशानात काम करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या दोघांवर स्मशानातील अस्थी विकण्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रिंकू नावाच्या व्यक्तिने स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, रिंकू यांचा 18 वर्षांच्या मुलाचं 3 नोव्हेंबर 2021रोजी निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार खन्ना येथील स्मशानात करण्यात आले. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी मुलाची एकच अस्थी शास्त्र म्हणून उचलली आणि ती एका कागदात लपेटून स्मशानातच एका ठिकाणी मातीखाली गाडून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मुलाच्या अस्थिंसाठी स्मशानात शोधू लागले तेव्हा ती अस्थी गायब होती. त्यावर ते बुचकळ्यात पडले.
त्यांनी खूप शोधूनही त्यांना अस्थी मिळाली नाही. अखेर त्यांनी स्मशानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात त्यांना काहीही सापडलं नाही. त्यानंतर त्यांनी निर्मल सिंह या स्मशान अधिकाऱ्याशी मैत्री वाढवली. तेव्हा त्यांनी अस्थी निर्मल सिंह यांच्याकडे मागितल्या तेव्हा त्यांनी त्या 21 हजार रुपयांना दिल्या. त्यानंतर रिंकू यांनी त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.






















































