गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
daler mehndi

पटियाला न्यायालयाने गुरुवारी पंजाबी गायक दलेर मेहेंदीला 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दलेर मेहंदी याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि गायकाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

पटियाला येथील एका जिल्हा न्यायालयाने आज पंजाबी गायक फालेर मेहंदीला 2003 च्या बेकायदेशीर ‘इमिग्रेशन रॅकेट’ प्रकरणात दोषी ठरवले आणि 15 वर्षांनंतर हा आदेश दिला. पटियालाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएस ग्रेवाल यांनी गायकाला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने दलेर मेहेंदीला दोषी ठरवून निकाल जाहीर केला. हा खटला 2003 चा आहे आणि दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर एकूण 31 गुन्हे दाखल आहेत.