निमगाव दुडेच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे पंकज पांडुरंग घोडे बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमगाव दुडे गावच्या उप सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पंकज पांडुरंग घोडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

९ सदस्य संख्या असलेल्या निमगाव दुडे ग्रामपंचायतीत बहुसंख्य सदस्य शिवसेनेचे शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्या विचारसरणीचे असून आगामी काळात ग्रामपंचायतीतील सर्वच पदाधिकारी ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकासात्मक कामे मार्गी लावतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते राहुल घोडे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी ग्रामसेविका शिला साबळे,सरपंच कविता पानगे, रावडेवाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब किठे,सामाजिक कार्यकर्ते विशाल रावडे,शिवाजीराव घोडे,अर्जुन घोडे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दुडे,सोसायटी संचालक तुकाराम कांदळकर,रामभाऊ गायकवाड,सर्वच ग्रामपंचायत सदस्य, महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच कविता पानगे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या निवडणुकीत पंकज घोडे यांची सर्वानुमते उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.