
उत्तराखंडमध्ये चंपावत विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा 54 हजार मतांनी विजय झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार निर्मला गहतोडी, सपाचे उमेदवार मनोज कुमार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पोटनिवडणुकीत विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे मतमोजणीनंतर इतिहास होणार असा मला विश्वास होता असे धामी म्हणाले. तसेच चंपावतच्या विकासासाठी जनता माझ्या पाठीशी उभा राहिली आहे. त्यामुळे त्यासाठी मला आता काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































