अजगराने गिळलं हरिणाचे पाडस, अजगराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका अजगराने हरिणाचं पाडस गिळले आहे. त्यानंतर अजगराचा मृत्यू झाला आहे. एका उसाच्या शेतात अजगर या पाडसाची शिकार करताना काही मुलींनी पाहिले आणि त्यांनी घाबरून आरडा ओरड केला.

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये एका उसाच्या शेतात एक अजगर हरिणाच्या पाडसाची शिकार करत होता. तेव्हा शेतकर्‍याच्या काही मुलींनी हे पाहिले आणि त्यांनी घाबरून आरडाओरड केली. तेव्हा ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली आणि वनविभागाला पाचारण केले. वन विभागाने अजगराला शेतातून बाहेर काढले आणि गंगा नदीच्या किनार्‍यावर सोडणार होते. पण तेव्हा अजगराचा मृत्यू झाला होता.

नंतर अजगराच्या पोटातील पाडस मृतावस्थेत बाहेर पडले. मोठा प्राणी गिळल्यामुळे अजगराचा मृत्यू झाल्याचे वनअधिकार्‍यांनी सांगितले. नंतर अजगराला दफन करण्यात आले आहे.