
दक्षिण आफ्रिकेचा 29 वर्षीय स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Quinton de Kock Retire) केली आहे. सेंच्युरियमध्ये टीम इंडियाकडून पराभूत होताच डीकॉकने टेस्ट क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक कारणांचा हवाला देत डीकॉकने कसोटी क्रिकेट सोडत असल्याचे म्हटले.
क्विंटन डीकॉकने 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला आणि डिसेंबर 2021 ला हिंदुस्थानविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. 7 वर्षांच्या आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्वही केले. मात्र काही काळापूर्वी त्याने कर्णधारपदाला रामराम केला आणि आता कसोटी क्रिकेटही सोडले. डीकॉकने 51 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने 91 डावांमध्ये फलंदाजी करताना 3300 धावा केल्या. या दरम्यान त्याने 6 शतक आणि 22 अर्धशतक ठोकली. नाबाद 141 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कौटुंबिक कारण
कसोटी क्रिकेटला रामराम करताना डीकॉक म्हणाला की, ‘या निर्णयापर्यंत पोहणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी बराच काळ माझ्या भविष्याबाबत विचार करत होतो. मी आणि साशा (डीकॉकची पत्नी) लवकरच आई-बाबा होणार आहोत. आमचे कुटुंब वाढणार आहे. माझे कुटुंबच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी कुटुंबाला अधिक वेळ देऊ इच्छितो.’
‘जीवनात तुम्ही सर्व काही खरेदी करू शकता मात्र वेळ विकत घेऊ शकत नाहीत. माझ्यामते योग्य निर्मय घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मला कसोटी क्रिकेट आवडते आणि देशासाठी खेळणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. परंतु आता माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी मला अधिक आवडतेय’m असेही डीकॉक म्हणाला.
फक्त टेस्टला रामराम
डीकॉकने कसोटी क्रिकेटला रामराम केला असला तरी मर्यादित षटकांचे क्रिकेट तो खेळत राहणार आहे. माझ्या कारकिर्दीचा शेवट झालेला नाही. मी पांढऱ्या चेंडूने खेळत राहणार असून देशाचे प्रतिनिधित्व करत राहील, असे डीकॉक म्हणाला. त्याच्या या निर्णयाचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने स्वागत केले आहे. डीकॉकसारखा खेळाडूने निवृत्ती घेणे आमच्यासाठी दु:खद आहे. त्याचे कुटुंब वाढणार असल्याने त्याला शुभेच्छा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत राहील, असे सीएसएचे कार्यकारी सीईओ फोलेट्सी मोसेकी यांनी म्हटले.
BREAKING: #Proteas wicket-keeper batsman, Quinton de Kock has announced his retirement from Test cricket with immediate effect, citing his intentions to spend more time with his growing family.
Full statement: https://t.co/Tssys5FJMI pic.twitter.com/kVO8d1e0Ex
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 30, 2021
डीकॉकची कारकिर्दी
डीकॉकने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटच्या तिने प्रारुपामध्ये त्याने आपली छाप सोडली. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 29 हजार धावा केल्या असून यात त्याच्या 58 शतकांचा आणि 171 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डे मध्ये त्याने 124 लढतीत 5355 तर 61 टी-20 लढतीत 1827 धावा केल्या आहेत.




























































