
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांना पाटण्यातील 10 सर्क्युलर रोडवरील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस देऊन हा बंगला खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, राबडीदेवी यांनी हा बंगला रिकामा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तुम्हाला जेवढा फोर्स बोलवायचा तेवढा बोलवा, आपण हा बंगला रिकामा करणार नाही, असे राबडीदेवी यांनी ठणकावले.
राबडीदेवी यांचा सरकारी बंगला खाली करण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी 10 सर्क्युलर रोड येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. सचिवालय एसडीपीओ अनु कुमारी यांनी बंगल्यात जाऊन राबडीदेवी यांची भेट घेतली. यावेळी काही अधिकारीही त्यांच्यासोबत होते. राबडीदेवी यांना 39 हार्ंडग रोड येथील देण्यात आलेल्या बंगल्यात शिफ्ट होण्याची विनंतीही करण्यात आली. 10 सर्क्युलर रोड येथील हे निवासस्थान आता पशु आणि मत्स्य उद्योग मंत्री नंद किशोर राम यांना देण्यात आले आहे. राजधानी पाटणाच्या व्हीआयपी भागातील 10 सर्क्युलर रोड येथील हा बंगला अनेक दशकांपासून राबडी देवी यांचे सरकारी निवासस्थान होता. हा बंगला केवळ आरजेडीच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्रच नव्हे तर पक्षाचे अनेक महत्त्वाचे निर्णय आणि धोरणात्मक बैठकीचे केंद्र ठरला होता.



























































