
हिंदुस्थानात दाखल झालेले राफेल लढाऊ विमान येत्या गुरुवारी हिंदुस्थानी हवाई दलात सामील करण्यात येणार आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्यासह सैन्य दलातील काही विशेष अधिकाऱयांच्या उपस्थित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाला येथील एअरबसजवळ हा कार्यक्रम पार पडणार आहे. फ्रान्स बनावटीचे राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडी 29 जुलै रोजी हिंदुस्थानात दाखल झाली होती. यात पाच विमानांचा समावेश होता.




























































