‘हा’ प्रसिद्ध गायक विदेश चलनाचा स्मगलर, ईडीने धाडली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

rahat-fateh-ali-khan-new

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान अडचणीत सापडला आहे. त्याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस धाडली आहे. FEMA चे उल्लंघन केल्यासंदर्भात ही नोटीस असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मीडियाच्या माहितीनुसार राहत फतेह अली खान याच्यावर स्मगलिंगचा आरोप करण्यात आला आहे. ईडीने याप्रकरणी नोटीस धाडल्याचे समजते.

मीडिया माहितीनुसार, राहत फतेह अली खान याने अवैधरित्या 3,40,000 यूएस डॉलर कमावले आहेत. या रकमे पैकी 2,25,000 डॉलरची स्मगलिंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तपास यंत्रणांना त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्याला स्मगलिंग प्रकरणी जमा केलेल्या रक्कमेवर 300% दंड भरावा लागेल. त्याने दंड भरला नाही तर लुकआउट नोटिस दिली जाईल, तसेच हिंदुस्थानात शो करण्यास ही त्याच्यावर बंदी घ्यालण्यात येण्याची शक्यता आहे.

या 2011 मध्ये त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सवा लाख डॉलर बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी या पैशांसंदर्भात त्याला कोणतेही कागदपत्र सादर करता आले नव्हते. त्यामुळे त्याचा मॅनेजर आणि त्याच्या प्रबंधकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.