
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या घोषणेवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘नवा हिंदुस्थान चीनवर अवलंबून आहे. ‘न्यू इंडिया’ म्हणजे चीन-निर्भर’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. पीएम मोदींनी 5 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या वेबसाइटनुसार, हैदराबादमधील रामानुजाचार्यांचा 216 फूट उंच पुतळा चिनी कॉर्पोरेशनने बनवला आहे. 135 कोटी रुपयांच्या या पुतळ्याचे कंत्राट चीनच्या एरोसन कॉर्पोरेशनला 2015 साली देण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी 5 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. हा पुतळा बसलेल्या स्थितीत जगातील सर्वात उंच धातूच्या शिल्पांपैकी एक आहे. हे हैदराबाद शहराच्या बाहेरील 45 एकर परिसरात वसलेले आहे. सुमारे 1000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प जगभरातील भाविकांच्या देणगीने पूर्ण झाला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला ‘हल्ला’ म्हटले होते. पंतप्रधान मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.





























































