
सामना ऑनलाईन । चेन्नई
कश्मीरमधील वातावरण बिघडण्यास वाजपेयींची धोरणे कारणीभूत ठरली अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसेच मोदींच्या धोरणामुळे यात भर पडली असेही राहुल यांनी म्हटले. तमिळनाडूतील एका महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.
राहुल म्हणाले की, “2004 साली युपीएचे सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा कश्मीरमधील वातावरण फारच बिघडले होते. वाजपेयी सरकारने चुकीची राजकीय धोरणे चावलयाने कश्मीरची अवस्था बिघडाली. आमच्या सरकारने जी रणनीती आखली त्यामुळे कश्मीरमधील परिस्थिती सुधरली.” आपण कश्मीरच्या जनतेशी संवाद संबंध दृढ करत असल्याचे राहुल यांनी म्हटले.
2004-2014 के बीच आतंकी घटनाओं में हुई मौतों की संख्या में नाटकीय गिरावट आई, क्योंकि हम जम्मू-कश्मीर के लोगों के साथ जुड़े और उन्हें अपने साथ लेकर आये : कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi #VanakkamRahulGandhi pic.twitter.com/FnOMLF4Xgt
— Congress (@INCIndia) March 13, 2019
२०११ ते २०१३ या काळात कश्मीरमध्ये दहशतवाद नसल्याचे राहुल यांनी म्हटले तसेच, “पंतप्रधान मोदी यांनी चुकीची धोरणे आखत भाजपने महबुमा मुफ्तीसोबत युती केली आणि कश्मीरमध्ये सरकार चालवले. यामुळे कश्मीरमध्ये परिस्थिती आनखीणच चिघळली. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान कश्मीरी जनतेला दहशतवादाच्य आगीत ढकलण्या यशस्वी झाला आहे. ” जर सरकाराला कश्मीरी जनतेला दहशतवाद आणि पाकिस्तानपासून वाचवू इच्छितो तो त्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजे असेही राहुल गांधींनी नमूद केले.
























































