
सामना ऑनलाईन । बंगळुरू
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेच्या सभागृहात मारलेली ‘मिठी’ काही क्षणात सोडवली, असली तरी त्याची चर्चा अद्यापही सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष असताना देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना अशी मिठी मारणं, हे बालिशपणाचं लक्षाणाचं लक्षण आहे, अशा शब्दात काँग्रेसचा कर्नाटकमधील मित्र पक्ष असलेल्या जेडीएसचे अध्यक्ष एच विश्वनाथ यांनी म्हटले आहे. कर्नाटकात सोबत असून देखील जेडीएस काँग्रेसला वेळोवेळी बोलण्याची संधी मात्र सोडताना दिसत नाही.
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जबरदस्त आक्रमक भाषणासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर एच विश्वनाथ यांनी ही प्रतिक्रिया दिली.
It is a childish act: H. Vishwanath, JDS Karnataka President on Congress President Rahul Gandhi hugging PM Modi during no-confidence motion debate pic.twitter.com/R4B3PU4fab
— ANI (@ANI) August 6, 2018
या आधी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील भरसभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना अश्रू ढाळले होते. ‘तुम्हाला वाटत असेल आपला अण्णा मुख्यमंत्री बनला आहे. पण माझे दुःख कोणाला सांगून हलके न करता मी ‘हलाहल’ पचवत आहे. बहुमत नसलेल्या सरकारचा प्रमुख बनण्याचा मला बिलकुल आनंद नाही’, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर उघड टीका केली होती.




























































