
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी कार्यकर्त्यांना सांगितले की, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘सर्वात मोठे टीआरपी’ आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजप राहुल गांधींना नेता म्हणून ठेवू इच्छितो, जर राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा असतील तर कोणीही पंतप्रधान मोदींवर टीका करू शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
‘नाहीतर, परदेशात कोणी काही बोलले आणि त्यावरून इथे खूप गदारोळ झाला असे कोणी पाहिले आहे का? संसद सुरू रहावी आणि अदानी आणि एलआयसीच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण अदानी मुद्द्यावर चर्चा का होत नाही? एलआयसीवर चर्चा का होत नाही? गॅसच्या दराबाबत चर्चा का होत नाही? या सर्व परिस्थितीत समान नागरी कायद्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आम्ही समान नागरी कायदा स्वीकारत नाही आणि आम्ही त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही’, असे ममता बॅनर्जी टीएमसी कार्यकर्त्यांना म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी नुकत्याच यूके दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन संसदेत गोंधळ उडाला आहे, त्यापार्श्वभूमीवर तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी टिपण्णी केली.



























































