राहुल गांधी अमेठीतून लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, अशी मोठी घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी शुक्रवारी केली. प्रियांका गांधी यांना निवडणूक लढवायची असेल तर त्या वाराणसीसोबत कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे अजय राय यांनी म्हटले.