हिमंता सरमा, मिलिंद देवरा काँग्रेसमधून गेले ते बरे झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या जोरदार चर्चेत आहे. याला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते पक्षातून निघून गेले ते चांगलेच झाले आहे. असे नेते पक्षाच्या विचारधारेशी एकरूप झाले नव्हते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आयाराम-गयाराम नेत्यांबद्दल परखड मत व्यक्त केले आहे.

देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक द्वेष पसरवत आहेत. वेगवेगळ्या राज्यांत असलेले अन्य पक्षांचे सरकार पाडण्याचे काम भाजपकडून उघडपणे केले जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजपने झारखंडमधील जनतेने निवडून दिलेले सरकार पह्डण्याचा आणि अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इंडिया आघाडीने भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. भाजपचा डाव उधळून लावला आहे, असे ते म्हणाले.