Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांना अन्नातून विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते आज रांची येथील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच रांची येथील सभेत राहुल गांधी यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली. राहुल यांचा मध्य प्रदेशचा दौराही रद्द करण्यात आला आहे. जयराम रमेश यांनी ट्विट करून राहुल गांधी सतनातील सभेला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.