
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड व थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान पर्यटनासाठी खुले केल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असलेला या व्यवसायाचा गाडा पुन्हा हलणार आहे.
या निर्णयाने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असला तरी कोरोनाचे काटेकोर नियम पाळले जात आहेत की नाही यावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला जबरदस्त तडाखा बसला. शहरांपेक्षा ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव हा जास्त फोफावला. वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे पुन्हा पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, धार्मिकस्थळे बंद झाली. हॉटेल, रिसॉर्ट, लॉज यांनाही बंदी करण्यात आल्याने व्यावसायिक अडचणीत आले होते. मात्र अन्यथा एक हजारांचा दंड
हॉटेल अस्थापनातील कर्मचारी याची आरटीपीसीआर तपासणी करणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. येणाऱ्या अभ्यंगताची संपूर्ण माहिती घेणे हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक आहे. प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणातील पर्यटकांना एक आठवडा अलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे.
रायगड जिल्हा हा चौथ्या टप्प्यात आहे.तर उरण आणि पनवेल तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाबाधित क्षेत्रात हॉटेल व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली।नाही निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड. आता जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा कमी होऊ लागल्याने शासनाने सर्वच ठिकाणी हॉटेल व्यवसाय नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेल्या आदेशान्वये पाचव्या टप्प्यातील असलेल्यांना ई पासशिवाय येण्यास बंदी आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या अभ्यंगताना हॉटेलमधील अंतर्गत खेळ, स्विमिंग पुलावर जाण्यास बंदी आहे. मोकळ्या जागेत व्यायाम, सायकलिंग करण्यास परवानगी आहे. पर्यटकांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपाहारगृहे ही 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
























































