रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश, आयआरसीटीसीकडून 2.5 कोटी फेक आयडी ब्लॉक

आयआरसीटीसीने एका मोठ्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. फेक युजर आयडीचा वापर करून रेल्वेच्या तिकिटाची बुकिंग करणाऱया तब्बल 2.5 कोटी फेक आयडीला ब्लॉक करण्यात आले आहे. या फेक आयडीमुळे अवघ्या काही मिनिटांत तिकिटाची बुकिंग केली जात होती. पाच महिन्यांच्या चौकशीनंतर आयआरसीटीसीने 2.9 लाख संशयित पीएनआरएसची माहिती उघडकीस आणली. यानंतर 2.5 कोटी फेक युजर आयडी ब्लॉक करण्यात आल्याचे आयआरसीटीसीने सांगितले. या फेक युजर आयडीमुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना वेटिंग लिस्ट मिळत असायची. तसेच अवघ्या काही सेकंदांत बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसायचे. सायबर फ्रॉड नेटवर्क, फेक आयडी आणि स्क्रीप्ट्सचा वापर करून तिकीट बुकिंगमध्ये गडबड केली जात होती, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱयाने सांगितले. हे फेक आयडी तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या अवघ्या पाच मिनिट आधी बनवण्यात आले होते. त्यामुळे हे सरळसरळ रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

बोट्स आणि ऑटोमेटेड टूल्सचा वापर

2.5 कोटी फेक युजर आयडीचा वापर बुकिंगसाठी केला जात असायचा. हे फेक अकाऊंट तिकिटाला जनरेट करत होते. त्यानंतर एजंटना महागडय़ा किमतीत तिकिटाची विक्री करत असायचे. ही सर्व प्रक्रिया बोट्स आणि ऑटोमेटेड टूल्सद्वारे केली जात असायची. या घोटाळ्याविरोधात रेल्वे अधिकाऱयांनी कठोर पावले उचलली. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ऑण्टिबोट ऑप्लिकेशन लागू केले. हे ऑटोमेटेड बुकिंगला ओळखते व ब्लॉक करते, त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे.