कोकण रेल्वेत राहिलेला मोबाईल रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला परत मिळवून दिला

कोकण रेल्वेतून ठाणे ते चिपळूण दरम्यान प्रवास करत असताना रेल्वे डब्यात राहिलेला 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल रेल्वे प्रशासनाने प्रवाशाला परत केला आहे. संकेत कान्हेकर हे कोकण रेल्वेच्या गाडीतून प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल डब्यातील सीटवर विसरले. रेल्वे कर्मचारी सचिन देशमाने आणि हिरालाल मीना यांना गाडीची तपासणी करताना हा मोबाईल सापडला.त्यानंतर स्टेशन मास्तर यांनी संकेत कान्हेकर यांना सावर्डे रेल्वे स्थानकात बोलावून मोबाईल परत दिला.