VIDEO: बुलढाण्यात मुसळधार पाऊस, वातावरणात गारवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बुलढाणा

बुलढाणा शहरात रविवारी दुपारी 12.30 वाजता अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक सुखावले. शहरातील काही भागात जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक पावसामुळे सुखावले. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण आहे.