संगमेश्वर तालुक्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो- रुपेश जाधव

संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडासह गुरुवारी दुपारी पावसाच्या सरी पडल्या . गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात ढगाळ वातावरण होते ढगाळ वातावरणामुळे हवेमध्ये उष्मा निर्माण झाला होता . सद्यस्थितीत भात कापणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी वायंगणी शेतीमध्ये गुंतला आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी दुपारच्या दरम्याने विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडल्या . ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत असून पावसाने आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली आहे.