दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याची सुरुवात होऊच शकली नाही. वारंवारच्या पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने 10 विकेटनी पाकिस्तानचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. या सामन्यात पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 146 धावांत आटोपला होता.

आज मुसळधार पावसामुळे खेळाडू आणि संघ अधिकारी हॉटेलमध्येच थांबले होते. अखेर स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.05 ला पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केल्याची औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या कसोटीनंतर बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जागतिक कसोटी क्रमवारीत सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.