दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबई- ठाण्यात मूसळधार पाऊस

514

सऱ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना मंगळवारी रात्री मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने बरसायला सुरुवात केली. ठाणे ते अंबरनाथ पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल, सायन, मुलुंड, भांडुप, बोरिवली या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.

जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात पडलेल्या पावसामुळे या भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या पावसाने अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. या पावसाचा फटका देवीच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीनाही बसला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या