याद्यांमध्ये गोंधळ तरी तीच यादी कशी वापरता? राज ठाकरे यांचा सवाल

विधानसभेसाठी वापरलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरणार आहात. ती यादीच सदोष होती. त्यामध्ये बराच घोळ होता हे समोर येऊनही पुन्हा तीच यादी कशी वापरली जाऊ शकते. आधी मतदार यादी दोषमुक्त करा, वगळलेल्या नावांची माहिती मतदारांना द्या, असा मुद्दा यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यामुळे जे आज 18 वर्षांचे झालेत त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही. तो हक्क त्यांना मिळू नये का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

  • अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच मतदाराची नावे दोन ठिकाणी नोंदवलेली आहेत. या गोंधळाचे काय करायचे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. एका मतदाराच्या ओळखपत्रावर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याची गंभीर बाबही त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणली.
  • मतदार यादीत एवढा गोंधळ असताना तुम्ही निवडणुकीला कसे सामोरे जाता? 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? अशा प्रश्नांचा भडीमार राज ठाकरे यांनी केला.