
सामना ऑनलाईन । मंगळुरू
गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानी लष्कराने सीमेपलीकडे जाऊन तीन ‘एअर स्ट्राईक’ केले. त्यातील दोन ‘एअर स्ट्राईक’ची माहिती देऊ; पण तिसऱया ‘एअर स्ट्राईक’बाबत काहीही सांगणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.
कर्नाटकात मंगळुरू येथील जाहीर सभेत गृहमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, लष्कराने सीमेपलीकडे जाऊन तीन ‘एअर स्ट्राईक’ केले. पहिल्यांदा उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरात घुसून दहशतवाद्यांचे लाँच पॅड उद्ध्वस्त केले. दुसऱयांदा पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमधील ‘जैश-ए-मोहम्मद’चा तळ ‘एअर स्ट्राईक’ने उद्ध्वस्त केला. तिसरा ‘एअर स्ट्राईक’ही केला गेला; पण याविषयी मी माहिती देणार नाही.

























































