थलाईवा इज बॅक ! सुपरस्टार रजनीकांत यांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या दमदार अभिनयामुळे साऊथसह बॉलीवूड गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रविवारी त्यांना अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात रजनीकांत यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तरीही त्यांना लगेच शूटिंगला सुरुवात करता येणार नाही. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा आराम करण्याचा तसेच तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला आहे. रोजच्या रोज त्यांचा रक्तदाब देखील तपासला जाणार आहे.