कोपरगाव ब्राह्मण सभेकडून खा. राजू शेट्टी यांचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाज दुखावला गेला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी होत असल्याचा आक्षेप कोपरगाव ब्राम्हण सभा व ब्राम्हण समाजाकडून घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना शुक्रवारी देण्यात आले.

राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान हातकणंगले येथे मंगळवारी केलेल्या भाषणात सीमेवर आमची पोरं जातात. कुणा देशपांडे, कुलकर्णीची पोरं सीमेवर जात नाहीत, असं विनाकारण बदनामी करणारे वक्तव्य केले होते. सीमेवर सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी लढतात याचा शेट्टीना विसर पडला आहे. ते लोकप्रतिनिधी असताना जबाबदार व्यक्तीने सैनिकांची जात काढणे, जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय व पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी अध्यक्ष वसंत ठोंबरे, संजीव देशपांडे, जयेश बडवे, वैभव जोशी, समीर कुलकर्णी, विकी जोशी, सचिन महाजन, विकास किर्लोस्कर, शुभांगी देशपांडे, गौरेष लहुरीकर, दिलीप जोशी, रत्नप्रभा पाठक, आरती महाजन, सागर जोशी, प्रभाकर नेने, श्रीकृष्ण देशपांडे, विजय जोशी, पत्रकार महेश जोशी, मनोज जोशी, विवेक जोशी,राहुल देशपांडे, उदय रुद्रभटे, शाम जोशी, उदय कुलकर्णी आदी समाजबांधव उपस्थित होते.

सीमेवर सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी लढतात याचा शेट्टीना विसर पडला आहे. ते लोकप्रतिनिधी असताना जबाबदार व्यक्तीने सैनिकांची जात काढणे, जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय व पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे. समाजाच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा कोपरगाव ब्राह्मण समाजाकडून निषेध करण्यात आला. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी, असे निवेदन कोपरगाव ब्राह्मण सभा व ब्राह्मण समाजाकडून तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.