जवान राकेश निंगुरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वीर जवान तुझे सलाम…’, ‘जय जवान… जय किसान…’, ‘राकेश निंगुरे अमर रहे.. अमर रहे…’, अशा घोषणा आणि भावपूर्ण वातावरणात तालुक्यातील बानगे येथील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे (वय 33) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

चंदिगढ येथे कार्यरत असताना शुक्रवारी राकेश यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. गावापासून उत्तरेला असलेल्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आर्यन याने राकेश यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवान राकेश निंगुरे यांना अभिवादन केले.

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषद सदस्य अंबरिश घाटगे, उपसभापती मनीषा सावंत, सरपंच वंदना सावंत, उपसरपंच दत्तात्रय लंबे, विकास पाटील, शिवानंद माळी, राजू पाटील, दता सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.