प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर दीड वर्षांनी राम मंदिराचे कामकाज पूर्ण

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचे कामकाज अर्धवट असतानाही 22 जानेवारी 2024 रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यानंतर राम मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. अखेर या सोहळ्याच्या दीड वर्षानंतर मंदिराचे कामकाज पूर्ण झाले आहेत. राम मंदिराकडून अधिकृतरित्यायाबाबत माहिती देण्यात आली आहे.

राम मंदिरातील रामाच्या मुख्य मंदिरासह भगवान शिव शंकर, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा यांची मंदिरे तसेच महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी, ऋषि पत्नी अहिल्या यांच्या मंदिरांचे देखील काम पूर्ण झाले आहे. संत तुलसीदास आणि जटायू यांच्या देखील मुर्त्या बसवण्यात आल्या आहेत.