मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त 30 एप्रिल? स्वामी गोविंद गिरी महाराज यांची माहिती

1620

अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्याचा संदर्भात येत्या 4 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 30 एप्रिल रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित होणार असल्याचे सांगून, महाराष्ट्र सदन व्हावं ही शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्याचे आपण स्वागतच करतो असे राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देव गिरी यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच राज्याने अयोध्येत आपापल्या प्रदेशाची भवने बांधावीत म्हणजेच ती भूमी हिंदुस्थानची सांस्कृतिक राजधानी होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असले असते तर त्यांना त्याचाही आनंद झाला असता, असेही ते यावेळी म्हणाले.

आज नगर येथे परमपूज्य गोविंद गिरी यांचा सत्कार समारंभ येथील सहकार सभागृह मध्ये पार पडला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

परम पूज्य गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम जन्मभूमी चा मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली . त्याचे आपण स्वागतच करतो. तसेच त्यांनी आयोध्येत महाराष्ट्रातील लोकांसाठी एक सदन बांधावे, असे वक्तव्य केले. त्यांची ही भूमिका अतिशय योग्य असून प्रत्येक राज्याने या याठिकाणी आपापले योगदान द्यावं. म्हणजेच आयोध्येचा हा विषय हिंदुस्थानचे संस्कार केंद्र व्हावे व संस्कार राजधानी व्हावी व ती होईल, असेही ते म्हणाले.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची चार एप्रिल रोजी तशी विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये भूमिपूजनाचा विषय व पुढील रूपरेषा या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे. 30 एप्रिल रोजी या मंदिराचे भूमिपूजन करण्याचा आमचा मानस असून या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंदिर बांधकामासाठी साधारणता तीन वर्ष याकरता लागणार आहे. जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे , तो 90% तोच राहणार आहे. हे मंदिर भव्य दिव्य कसे व्हावे व यामध्ये अन्य काही सुधारणा काही करायचे असल्यास त्याचा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे .संपूर्ण मंदिर हे पाषाणाचे मंदिर तयार केले जाणार आहे. यामध्ये रामाची मूर्ती हीसुद्धा जी पुरातन आहे ती याठिकाणी राहणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंदिर उभारणीसाठी ज्यांना ज्यांना निधी द्यायचा आहे, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा या ठिकाणी जे खाते उघडले आहे त्या खात्यामध्ये तो निधी जमा करावा, असे आवाहनही यावेळी गोविंददेव गिरीजी यांनी केले आहे . या मंदिरासाठी बालाजी देवस्थान यांनी या अगोदर शंभर कोटी रुपये जाहीर केले आहे . तसेच एका संस्थेने दहा कोटी रुपये देणगी जाहीर केलेला आहे. शिवसेनेने काल एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे आपण त्याचे स्वागतच करतो, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत महाराष्ट्रतील लोकांसाठी महाराष्ट्र भवन उभारले जावे, अशी भूमिका घेतली, त्याचे आपण स्वागतच करतो. वास्तविक पाहता या ठिकाणी प्रत्येक राज्याने, असे करावे. जेणेकरून भक्तनिवास उभे राहून याठिकाणी जनतेला राहण्याची सोय होईल. आणि खऱ्या अर्थाने आयोध्या ही एक देशाची सांस्कृतिक भूमी दिसेल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या