LIVE- राम मंदिराबाबतची सुनावणी पुढे का ढकलली? वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राम मंदिराबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. १० जानेवारी रोजी नव्या पीठाचे गठन होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होतं, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाचे गठन करणं आवश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या